वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
- शासनाकडून प्राप्त सहाय्यक अनुदान रकमेतून महामंडळामार्फत ही योजना राबविण्यात येते.
- अर्जदाराचे किमान वय वर्षे 18 ते 50 असावे. तसेच अर्जदार हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत.
- बँकांकडून कर्जमर्यादा रु.10.00 लक्षपर्यंत.
- बँकेने रु.10.00 लाखांच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या उमेदवाराने वेळेचे कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम (12% च्या मर्यादेत) त्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. सदर योजना संपूर्णपणे संगणकीकृत असून सदर सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणाली अथवा तत्सम संगणक प्रणालीवर राबविण्यात येईल. व्यवसायाच्या स्वरुपानुसार कर्ज रक्कम मंजूर करण्यात येईल.
- कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
- वेब पोर्टल / महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नांव नोंदणी करणे अनिवार्य असेल.
- कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या निकषानुसार असेल.
- अर्जदाराने महामंडळाकडून सशर्त पात्रता प्रमाणपत्र (एल ओ आय) प्राप्त झाल्यानंतरच बँकेकडून कर्ज प्रकरण मंजूर करुन घ्यावे लागेल.
- जर अर्जदाराने मध्येच नियमित कर्ज परतफेड नाही केली तर व्याज परतावा दिला जाणार नाही.
- अर्जदाराने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान 2 फोटो अपलोड करावेत.
- अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नॉन क्रिमीलेयरच्या मर्यादेत असावी.
लाभार्थी:
-
फायदे:
-
अर्ज कसा करावा
संबंधीत जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा