महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना
- लाडशाखीय वाणी / वाणी समाजातील महिलांचे सक्षमीकरण करुन त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे.
- सदर योजना ही ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे.
- महिला बचत गटांना बँकांमार्फत वितरीत केलेल्या रु.5.00 लक्ष ते रु.10.00 लक्षपर्यंतच्या कर्ज रकमेवरील 12% व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा महामंडळाकडून संबंधित बचत गटांना अदा करण्यात येते.
- पात्र महिला बचत गटातील फक्त इतर मागास प्रवर्गाच्या महिला अर्जदारांना व्याज परतावा योजनेचा लाभ महामंडळाकडून देण्यात येईल.
- महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचलित साधन केंद्र (सीएमआरसी) मार्फत शिफारस केलेल्या महिला बचत गटात किमान 50% लाडशाखीय वाणी / वाणी समाजातील महिला असतील असा बचत गट व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील.
- प्रथम टप्यातील कर्ज नियमित परतफेडीनंतर सदर बचत गट द्वितीय टप्प्यात रु.10.00 लक्ष पर्यंत कर्ज बँकेकडून मंजूर करुन घेण्यास पात्र होईल.
- महिला बचत गटातील महिला इतर मागास प्रवर्गातील लाडशाखीय वाणी / वाणी समाजाची व महाराष्ट्राची रहिवाशी असावी.
- पात्र महिलांचे किमान वय 18 व कमाल वय 60 वर्षे राहील.
- महामंडळामार्फत महिला बचत गटाच्या बँक खात्यामध्ये दर तिमाही व्याजाचा परतावा बँकेच्या मंजूरीनुसार 5 वर्षापर्यंतच्या कालावधीकरीता बँक प्रमाणिकरणानुसार अदा करण्यात येईल.
- सदर योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्र (सीएमआरसी) च्या सहाय्याने राबविण्यात येईल.
- लोकसंचालित साधन केंद्र (सीएमआरसी) मार्फत प्राप्त झालेल्या प्रस्तावास महामंडळामार्फत पात्रता प्रमाणपत्र (एल ओ आय ) निर्गमित करण्यात येते.
- बचत गटास महामंडळाकडून सशर्त पात्रता प्रमाणपत्र (एल ओ आय) प्राप्त झाल्यानंतरच बचत गटाने बँकेकडून कर्ज प्रकरण मंजूर करुन घ्यावे.
लाभार्थी:
-
फायदे:
-
अर्ज कसा करावा
संबंधित जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा.